Ticker

🔴 BREAKING NEWS
Loading...

Ad Code

एकनाथ खडसे यांच्यावर चंद्रकांत पाटलांची टीका: "अपघाती मंत्री ते उपद्रवमूल्य"; मुक्ताईनगरच्या ड्रोन रेकीवरूनही हल्लाबोल




जळगाव (प्रतिनिधी): शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे हे अपघाती मंत्री होते, अशी टीका करत त्यांना प्रत्येक निवडणुकीत धोबीपछाड दिल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. शेतकरी दुष्काळाच्या छायेत असताना खडसे कुटुंबीय फुगड्या खेळत होते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

"खडसे परिवाराला भाजपने पदे दिली, तरी ते त्यांचे झाले नाहीत"
एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या पक्षाशी नेहमी गद्दारी केल्याचा आरोप करत चंद्रकांत पाटील म्हणाले की, खडसे यांना भाजपने सर्वपक्षीय पदे दिली, ताकद दिली; परंतु तरीही ते कधीही पक्षाचे झाले नाहीत. त्यांना विधानसभेत आणि नगरपंचायतीमध्ये त्यांची जागा दाखवून दिली असून प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना धोबीपछाड देण्यात आली आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच, एकनाथ खडसे यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा झाला, त्यावेळी शेतकरी संकटात आणि दुष्काळाच्या छायेत होता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ड्रोन रेकीप्रकरणी बुद्धिमत्तेवर शंका
काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील फार्म हाऊस आणि निवासस्थानावर ड्रोनद्वारे रेकी करण्यात आल्याचा आरोप समोर आला होता. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "एकनाथ खडसे यांची बुद्धिमत्ता मुक्ताईनगरच्या विकासासाठी किती कामी आली? मला त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावीशी वाटते." पायलट ट्रेनिंग कंपनीची विमाने या मार्गाने जात असतात, त्यामुळे अशा गोष्टी माध्यमांसमोर मांडण्यापूर्वी अधिकाऱ्यांकडून खात्री करून घेतली पाहिजे होती, असा टोला त्यांनी लगावला. एकनाथ खडसे यांचे राजकारणात केवळ 'उपद्रवमूल्य' म्हणून नाव उरले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा: मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पक्का रस्ता पोहोचवण्यासाठी प्रयत्नांना गती!

मुक्ताईनगर येथे नुकतीच 'मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर, रावेर आणि बोदवड तालुक्यांतील शेत-पाणंद रस्त्यांची मोजणी, आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतापर्यंत जाण्यासाठी हक्काचा आणि पक्का रस्ता मिळाला पाहिजे, हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कामे पूर्ण करावीत, अशा सक्त सूचना यावेळी देण्यात आल्या.

आढावा बैठकीतील ठळक मुद्दे:

  • रस्त्यांची मोजणी: एकूण ७७ शेत-पाणंद रस्त्यांच्या मोजणीसाठी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून, त्यापैकी आतापर्यंत २५ ते ३० रस्त्यांची मोजणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.

  • अडचणी आणि उपाययोजना: संबंधित विभागांकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे मोजणीच्या कामात काहीसा विलंब होत असल्याची बाब यावेळी बैठकीत प्रकर्षाने मांडण्यात आली. यावर मात करण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय साधून उर्वरित कामे अतिशय गतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • प्रमुख उद्दिष्टे: रस्त्यांची मोजणी लवकरात लवकर पूर्ण करणे, आवश्यक ती सर्व प्रशासकीय मान्यता मिळविणे आणि प्रलंबित प्रक्रिया अत्यंत जलदगतीने पार पाडणे, जेणेकरून शासनाच्या या कल्याणकारी योजनेचा लाभ थेट प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल.

उपस्थितमान:

या उच्चस्तरीय आढावा बैठकीस प्रांत अधिकारी श्री. जितेंद्र पाटील, मुक्ताईनगरचे तहसीलदार श्री. गिरीश वखारे, बोदवडचे तहसीलदार श्री. ज्ञानेश्वर सपकाळे, मुक्ताईनगरच्या गटविकास अधिकारी कीर्ती कनवाडे, रावेरचे गटविकास अधिकारी श्री. विनोद मेढे, बोदवडचे गटविकास अधिकारी श्री. डी. जी. जाधव, वनविभागाच्या आरएफओ कृपाली शिंदे, भूमी अभिलेख अधिकारी वंदन जाधव, पंचायत समिती बांधकाम विभागाचे अभियंता श्री. दीपक भंगाळे, कृषी अधिकारी श्री. अभिजीत शिंदे यांच्यासह महसूल, कृषी, भूमी अभिलेख, वनविभाग आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

तसेच, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. छोटूभाऊ भोई, शिवसेना जिल्हा संघटक श्री. सुनील पाटील, शिवसेना अल्पसंख्यांक महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अफसर खान, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. नवनीत पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख श्री. पंकज राणे, शिवसेना उपजिल्हा संघटक श्री. महेंद्र मोंढाळे यांच्यासह महायुतीचे शिवसेना-युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव या बैठकीस उपस्थित होते. 


Chandrakant Patil, Eknath Khadse, Jalgaon News, Muktainagar, Eknath Khadse Drone, Shinde Sena, NCP Sharad Pawar Faction, Maharashtra Politics. चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, जळगाव बातमी, मुक्ताईनगर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

0